WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026: Unlock Bright Futures, सफाई कामगारांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना. जाणून घ्या!

Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026: Unlock Bright Futures, सफाई कामगारांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना. जाणून घ्या!

Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. तर मित्रांनो आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे तर या योजनेबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत.

सफाई कामगार पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना ही सामाजिक न्याय व विशेष विभागातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना काय आहे? या योजनेचे उद्देश काय आहे? या योजनेसाठी पात्रता काय आहे? व अर्ज कसा करायचा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026)

Ladki Bahin Yojna E-KYC 2026: Step by Step Guide. Kyc Quickly and Easy. लाडकी बहीण योजनेची E-KYC घरबसल्या सोप्या पद्धतीने करा.

काय आहे ही योजना? (Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026)

तर मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समाजातील सफाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या कुटुंबांना व त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे व व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. (Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026)

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये व इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदत करणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे समाजातील गरीब कुटुंबांना व त्यांच्या मुलांना शैक्षणिक स्तर वाढवण्यास चालना मिळणार.

पात्रता काय?

  • विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थी शासनातर्फे मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याचे पालक सफाई कामगार म्हणून काम करत असावे.
  • या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.
  • सफाई कामगारांच्या सर्व मुलांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

कागदपत्रे कोणती?

  • पालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी.) ( Aadhar card,Pan card,Voting Card)
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र (School Bonafide Certificate)
  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (Student Aadhar Card)
  • विद्यार्थ्याचे बँक खाते (Student Bank Passbook)
  • पालक सफाई कामगार असल्याचे प्रमाणपत्र (Safai Worker Certificate)

 

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम अर्जदाराने महाडीबीटी (mahaDBT) च्या अधिकृत संकेतस्थळावर (mahaDBT Portal) जाऊन ऑनलाईन अर्ज करावे. येथे क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जदाराने त्याची आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावरती अपलोड करावी. (Ex. Aadhar card, bank passbook, Bonafide Certificate, Safai Worker Certificate, Father Aadhar card.etc)
  • अर्ज केल्यानंतर हा अर्ज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तसेच शाळेच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाते.
  • अर्ज पडताळणी केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना अर्ज मंजूर झाल्यावर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार.

टीप: अर्जदाराने योग्यरीत्या कागदपत्रे अपलोड करावी. अर्जदारास अर्ज करण्यास कुठलीही अडचण आली तर जवळच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये जाऊन चौकशी करावी.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) (Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026)

Q.1. या शिष्यवृत्तीचा लाभ कोण घेऊ शकतो.

या शिष्यवृत्तीचा लाभ सफाई कामगारांच्या मुलांना घेता येणार आहे.

Q.2. या योजनेची उत्पन्न मर्यादा किती?

या योजनेसाठी कुठलीही उत्पन्न मर्यादा नाही आहे.

Q.3. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

विद्यार्थ्याचे व पालकाचे आधार कार्ड, शाळेचे बोनाफाईट प्रमाणपत्र, बँक खाते, पासपोर्ट साईज फोटो आणि पालक सफाई कामगार असल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.

Q.4. शिष्यवृत्तीची रक्कम किती टप्प्यामध्ये मिळणार?

अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार.

Q.5. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा कोणत्या वर्गात शिक्षण घेत असावा?

विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असावा.

Q.6. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

सफाई कामगार म्हणून काम करत असलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे हे उद्दिष्ट आहे.

Q.7. या योजनेचा अर्ज कसा करावा?

ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी ऑनलाईन यावरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा काही शंका असल्यास जवळच्या सामाजिक न्याय विभागांमध्ये जाऊन भेट देऊ शकता.

Q.8. सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना काय आहे?

सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे व त्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Q.9. ही योजना कोणत्या विभागातर्फे चालू करण्यात आली?

ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबवली जाणार आहे.

Q.10. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला किती रुपये रक्कम मिळणार?

याबद्दलची माहिती सध्यातरी उपलब्ध झालेली नाही आहे.

Leave a Comment