WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lek Ladki Yojana 2025: ₹1 Lakh Aid for Girls लेक लाडकी योजना मुलींना लाखाची मदत, तुमची मुलगी पात्र आहे का? पटापट तपासा!

Lek Ladki Yojana 2025: ₹1 Lakh Aid for Girls लेक लाडकी योजना मुलींना लाखाची मदत, तुमची मुलगी पात्र आहे का? पटापट तपासा!

Lek Ladki Yojana 2025: नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून एक एप्रिल 2023 रोजी लेक लाडकी योजना ही मुलींसाठी नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ‘लेक लाडकी योजना’! ही योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये शासनातर्फे मदत करण्यात येते. (Lek Ladki Yojana 2025)

मुलींचा सक्षमीकरणासाठी जन्मदर वाढवण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरिता या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेकरिता तुमची मुलगी पात्र आहे का? आणि अर्ज कसा करायचा? या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला योजनेची संपूर्ण माहिती, पात्रता, आणि अर्ज प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग माहिती बघायला सुरुवात करूया. (Lek Ladki Yojana 2025)

Ladki Bahin Yojna EKYC 2025: लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी: घरबसल्या अर्ज करा, लाभ सुरळीत ठेवा!

लेक लाडकी योजना: काय आहे ही योजना (Lek Ladki Yojana 2025)

महाराष्ट्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेच्या अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री या योजने सुधारणा करून लिंक लाडकी योजना एक एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आले या योजनेच्या अंतर्गत मुलींच्या जन्माला प्रोत्साहन आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी आहे. ही योजना गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक आधार देण्यासाठी ज्यामुळे मुलींच्या बालविवाहस, कुपोषण, आणि शिक्षणाचा अभाव यासारख्या समस्यांवर  आघात घालण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग मार्फत  राबवण्यात येत आहे. (Lek Ladki Yojana 2025)

योजनेचे प्रमुख उद्देश:

  • मुलींच्या जन्माला प्रोत्साहन: कुटुंबांना मुलींच्या जन्मासाठी आर्थिक मदत व मुलींच्या जन्माष्टात देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • शिक्षण वाढ: इयत्ता १ली पासून ते १२वी पर्यंत च्या शिक्षणात प्रोत्साहन देण्याकरिता.
  • बालविवाह थांबवणे: मुलींचे बालविवाह थांबवण्यासाठी योजना सुरू करण्यात आली.
  • कुपोषण कमी: पोषणासाठी मदत व मुलींमध्ये कुपोषण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • महिला सक्षमीकरण: मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • लैंगिक समानता: मुलींना मुलांप्रमाणेच समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी.

योजनेची रचना: ५ टप्प्यात १ लाख १ हजार रुपये

लेक लाडकी योजनेची रक्कम ही ५ टप्प्यांत राबवली जाते, ज्यामध्ये जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत मिळते:

  1. जन्माच्या वेळी: ५,००० रुपये ही पहिली इंस्टॉलमेंट (जन्म दाखला सादर केल्यावर) मिळते.
  2. इयत्ता पहिलीत प्रवेश: ६,००० रुपये ही दुसरी इन्स्टॉलमेंट मुलींच्या शाळेत प्रवेश मिळाल्यावर मिळत असते. (प्रवेश प्रमाणपत्रासोबत).
  3. इयत्ता सहावीत प्रवेश: ७,००० रुपये. ही रक्कम सहावी मध्ये प्रवेश केल्यावर ती मिळते.
  4. इयत्ता बारावीत पास: ८,००० रुपये ही चौथी रक्कम बारावी पास झाल्यानंतर (मार्कशीट सादर केल्यावर) मिळत असते.
  5. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर: ७५,००० रुपये ही पाचवी किस्त 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ती शिक्षक विभाग यासाठी देण्यात येत असते. (शिक्षण किंवा विवाहासाठी).

एकूण मदत: १,०१,००० रुपये. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल, आणि आधार कार्ड हे बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे.

कोण पात्र आहे? पात्रता निकष

ही योजना गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे, आणि खालील निकष पूर्ण करणाऱ्या मुली पात्र असतील:

  • मूळ निवासी: मुलगी महाराष्ट्रातील मूळ निवासी असावी.
  • उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी.
  • रेशन कार्ड: पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारक या योजने त अर्ज करू शकणार
  • शासकीय सेवा: कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा.
  • इतर योजना: मुलीला केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर शैक्षणिक योजनांचा लाभ मिळत नसावा.
  • जन्मतारीख: मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर झालेला असावा. ही योजना एक एप्रिल 2023 नंतर जन्मास आलेल्या  मुलींना लागू राहील. जर एका कुटुंबामध्ये दोन मुली असेल तर दोन्ही मुलींना हा लाभ मिळू शकणार.
  • मुलगा-मुलगी प्रमाण: कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास फक्त मुलीला लाभ मिळेल. (जुळ्या मुली असेल तर दोघांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे)
  • वयोमर्यादा: १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम. आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार.

टीप: जुळ्या मुली असल्यास दोघींनाही लाभ मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • मुलीचा जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate).
  • आई-वडिलांचे आधार कार्ड. (मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.)
  • रेशन कार्ड (Yellow or Orange).
  • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate). चालू वर्षाचा असावा.
  • बँक खाते तपशील (Passbook) बँक खाते आधार कार्डशी सलग्न असणे गरजेचे आहे.
  • पासपोर्ट साइज फोटो (मुलीचा आणि पालकांचा).

अर्ज कसा करावा?

लेक लाडकी योजनेचा अर्ज तुमच्या जिल्ह्यातील किंवा तुमच्या तालुक्यात महिला बाल विकास विभागामध्ये भरण्यात येत असतो. योजनेचा अर्ज भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. कार्यालयाला भेट: तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभाग कार्यालयामध्ये किंवा अंगणवाडी केंद्र ला भेट द्या.
  2. अर्ज फॉर्म: ‘लेक लाडकी योजना अर्ज’ मिळवा आणि भरा. यात वैयक्तिक माहिती, पत्ता, मोबाइल नंबर, अपत्याची माहिती, बँक तपशील, आणि आणि इतर संपूर्ण माहिती  ऑफलाइन त्या फॉर्ममध्ये भरण्यात यावे.
  3. कागदपत्रे सादर: मुलीचा जन्म दाखला राशन कार्ड उत्पादन दाखला आई-वडिलांचा आधार कार्ड बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो वडिलांचा किंवा पत्त्याचा इत्यादी. वरील सर्व कागदपत्रे सादर करा.
  4. पोहोचपावती: अंगणवाडी सेविका किंवा अधिकाऱ्याकडून पोहोचपावती घ्या. व ती सांभाळून तुमच्याजवळ ठेवावी.

मुदत: जन्मानंतर ६ महिन्यांत पहिला अर्ज करा, आणि इतर टप्प्यांसाठी प्रवेश/पास झाल्यानंतर ३ महिन्यांत अर्ज करण्यात यावा.

योजनेचे फायदे: मुलींसाठी का आहे खास?

  1. आर्थिक आधार: १ लाख १ हजार रुपये मदतमुळे मुलींच्या शिक्षणास पोषणास आणि विवाह यासाठी पैशाची आर्थिक मदत मिळणार.
  2. शिक्षणाला चालना: इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत टप्प्याटप्प्याने मदत, ज्यामुळे स्कूल ड्रॉपआऊट कमी होईल. मुलीच्या शिक्षणाला चालना मिळेल.
  3. बालविवाह थांबवणे: १८ वर्षांनंतर एकरकमी रक्कममुळे विवाहासाठी आर्थिक आधार मिळेल. व बालविवाह थांबवण्यात मदत होणार.
  4. कुपोषण कमी: आर्थिक मदतीमुळे पोषणासाठी मदत मिळेल. ज्यामुळे मुलींचं आरोग्य सुधारेल. व कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास चालला मिळेल.
  5. महिला सक्षमीकरण: मुली स्वावलंबी होऊन समाजात मजबूत भूमिका बजावण्यास सुवर्णसंधी प्राप्त होणार.

Awareness and tips

  • मुदतीचं पालन: टप्प्याच्या वेळी अर्ज करा, अन्यथा लाभ मिळणार नाही.
  • कागदपत्रे पूर्ण: सर्व कागदपत्रे सत्यप्रत असावीत, अन्यथा अर्ज रद्द होईल. व अर्ज भरतेवेळी संपूर्ण कागद योग्यरीता जोडण्यात यावे.
  • अंगणवाडी मदत: ग्रामीण भागातील कुटुंबांनी अंगणवाडी सेविकांशी बोलून मदत घ्या.
  • अधिकृत पोर्टल: फक्त mahilavbalvikas.maharashtra.gov.in वरून माहिती घ्या.
  • हेल्पलाइन: समस्येसाठी १८००-२१२-३४५६ वर संपर्क साधा.

निष्कर्ष: मुलींच्या भविष्यासाठी एक पाऊल

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी एक वरदान आहे. १ लाख १ हजार रुपये मदतमुळे मुलींचं शिक्षण, आरोग्य, आणि स्वावलंबन यांना चालना मिळेल. जर तुमची मुलगी पात्र असेल, तर आजच अंगणवाडी केंद्र किंवा महिला बाल विकास कल्याण विभाग कार्यालयात जा आणि लगेच अर्ज करा. व ही संधी गमावू नका!

तुम्हाला ही योजना कशी वाटली? तुमची मुलगी योजनेसाठी अर्ज करणार का? जर तुमच्या मुलीचा जन्म 2023 नंतर झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही माझी तुम्हाला कुठे पडली की नाही याबद्दल. खाली कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करा, आणि हा ब्लॉग तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना या महत्त्वाच्या योजनेची माहिती मिळेल! मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!


कॉपीराइट नोटिस
© 2025 Maziibatm. सर्व हक्क राखीव. या ब्लॉगमधील मजकूर, प्रतिमा आणि इतर सामग्री Maziibatm च्या मालकीची आहे. कोणत्याही प्रकारे कॉपी करणे, पुनरुत्पादन करणे किंवा वितरण करणे यास परवानगी नाही. हा ब्लॉग पूर्णपणे मूळ आहे आणि कोणत्याही बाह्य स्रोतावरून कॉपी केलेला नाही.

Leave a Comment