WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Graduate Voter registration Online Maharashtra 2025: पदवीधर मतदान नोंदणी. असा भरा फॉर्म!

Graduate Voter registration Online Maharashtra 2025: पदवीधर मतदान नोंदणी. असा भरा फॉर्म!

Graduate Voter registration Online Maharashtra 2025: नमस्कार मित्रांनो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल. तर तुम्ही पदवीधर मतदान नोंदणी करू शकता. भारतीय निवडणूक आयोग तर्फे नागपूर विभागाच्या पदवीधर विधान परिषद मतदार संघासाठी मतदार यादी नवीन प्रमाणे जाहीर करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. (Graduate Voter registration Online Maharashtra 2025)

जर तुम्हाला पदवीधर मतदान नोंदणी करायची असेल पदवीधर मतदान नोंदणी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आपण या लेखांमध्ये पदवीधर मतदान नोंदणी कशी करायची? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ? व अर्ज कसा करायचा ? आणि पात्र कोण राहणार ? आणि (Form 18) कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया. (Graduate Voter registration Online Maharashtra 2025)

E Shram Card Apply Online 2025: ईश्रम कार्ड कसं काढायचं ते पण घरबसल्या ? जाणून घ्या!

कागदपत्रे कोणती लागणार? (Graduate Voter registration Online Maharashtra 2025)

तुमचा अर्ज ऑनलाईन भरण्यापूर्वी खालील प्रमाणे कागदपत्रे गोळा करून ठेवावी जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. कागदपत्रे खालील प्रमाणे सादर करावे:

  • अर्जदाराची विद्यापीठाने जारी केलेली पदवी (Degree)
  • पदवीच्या अंतिम वर्षाची उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका.
  • अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरी (PDF स्वरूपात 100 KB पेक्षा कमी)
  • राशन कार्ड (Adress Proof म्हणून)
  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे)

पात्रता काय?

  • अर्जदारा पदवीधर असावा.

अर्ज कसा करायचा?

  • अर्जदारांनी सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या अधिकृत http://mahaelection.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावे व त्याला ओपन करून घ्यावे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून व कॅपचा भरून घ्यावा. तुमचा नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल.
  • ओटीपी व्हेरिफाय करून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे.
  • तुमचा मतदार यादीतील (पार्ट नंबर)आणि (सिरीयल नंबर) व मतदान कार्डचा (एपिक नंबर )प्रविष्ट करून सेव या बटणावर क्लिक करावे.
  • तुम्ही ज्या पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदान करत आहात तो मतदारसंघ निवडावा.
  • त्यानंतर तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर इत्यादी वैयक्तिक माहिती भरून घ्यावी.
  • त्यानंतर तुमचा पत्ता व पिन कोड योग्यरित्याने भरून घ्यावे.
  • त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती ही भरून घ्यावी व तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
  • सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्यावा त्यानंतर तुम्हाला एक नॉलेजमेंट (aknowlagement)नंबर मिळेल त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवावी.

अशाप्रकारे तुम्ही मतदान नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करतानी कोणत्या अडचणी आल्या याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवावी आणि जास्तीत जास्त तुमच्या पदवीधर मित्रांना हा लेख शेअर करावा जेणेकरून त्यांना अर्ज करण्यास कोणतीही अडचण होणार नाही व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल चला तर मग भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.

Leave a Comment